अकोला : महापालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. महापालिकेतील 20 प्रभागातील 80 जागांसाठी ही सोडत काढण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अकोला महापालिकेची सदस्यसंख्या 73 एवढी आहेय. मात्र, महापालिकेचा हद्दवाढीत 24 गावांचा समावेश झाल्यानंतर महापालिकेच्या सदस्य संख्येत सातची वाढ झालीये. आज जाहीर झालेल्या सोडतीत 40 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यात अनुसुचित जातीच्या 7, जमातीच्या एक आणि 11 ओबीसी महिलांच्या समावेश आहेय. तर उर्वरित जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे.


महापालिकेत अनुसुचित जातीसाठी 13, अनुसुचित  जमातीसाठी 2, तर ओबीसींसाठी 22 जागा आरक्षित करण्यात आल्यायेत . प्रत्येक प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्यानं महापालिकेतील  सध्याच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांवर गडांतर आलं नाही.


महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, माजी महापौर मदन भरगड यांचे प्रभाग आरक्षणात सुरक्षित राहिलेयेत. आजच्या सोडतीनंतर अकोल्यात पुढच्या काळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.