अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या
एक महिन्यापूर्वी तलावात आढळळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुन्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली असून मृत व्यक्तीच्या हातावर बांधण्यात आलेल्या धाग्या वरून पोलिसांनी हत्येचा उलगढा केलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
अंबरनाथ : एक महिन्यापूर्वी तलावात आढळळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुन्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली असून मृत व्यक्तीच्या हातावर बांधण्यात आलेल्या धाग्या वरून पोलिसांनी हत्येचा उलगढा केलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील माणरे गावातील गोपीनाथ जोशी यांच्या शेताजवळील तलावात एक मृतदेह नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत दगडाने बांधून टाकला होता, तो मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थतेत होता, मात्र त्याच वेळेला प्रेमनारायण खंगारा यांनी चिंचपाडा कल्याण येथून रमाकांत खंगारा हा २४ वर्षीय इसम बेपत्ता असल्याची तक्रार विठ्ठल वाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती, तक्रारदार प्रेमनारायण याना मयत इसमाचा फोटो दाखवण्यात आला मात्र त्यांनी फोटोतील इसम अतिशय कुजलेल्या अवस्थतेत असल्याने त्यांनी तो ओळखला नाही
मात्र , प्रेमनारायण आणि मयत इसम याच्या हातावर बाधण्यात आलेल्या धागा सारखा असल्याचे समोर आले त्यामुळे मयत इसम हा प्रेम नारायण याचा हरवलेला भाऊ रमाकांत खंगारा असल्याचे समोर आले . त्यानंतर रमाकांत यांनी आपला भाऊ हा उत्तर प्रदेश हुन करण खाटीक याच्या सोबत कल्याण ला आला होता मात्र करण हा आपल्या पत्नी सोबत आपल्या उत्तर प्रदेश येथील आपल्या गावी परत आला मात्र त्याला रमाकांत याबाबत विचारले असता त्याने टाळा टाळा केली आणि तो पळून गेला , त्यानंतर पोलिसाना करणं वर संशय आला आणि त्यांनी करणं ला उत्तर प्रदेश येथून अटक केली.
तेव्हा त्याने आपण रमाकांत ची हत्या केल्याची कबुली दिली , रमाकांत याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध होते त्यामुळे आपण त्याची हत्या केल्याची कबुली त्याने दिली , त्याला या हत्त्येत त्याचे वडील सुंदरलाल खाटीक , भाऊ अर्जुन , यांनी त्याची गळा दाबून हत्या केली होती या प्रकरणी करणं आणि त्याचे वडील सुंदरलाल याना पोलिसांनी अटक केली आहे