नवी मुंबई : पालिका स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत तीव्र नाराजी पुढे आलेय. आधी शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना विरोध झाला होता. त्यामुळे 20 नगसवेकांनी आपले राजीनामे सादर केले होते. आता या निवडणुकीतून नाव वगळ्यामुळे नगरसेविका सरोज पाटील नाराज असून पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेतील स्थायी समिती सदस्यपदी शेवटच्या क्षणी नाव वगळ्यामुळे नगरसेविका सरोज पाटील नाराज आहेत. त्या पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  आम्हला विश्वासत न घेता नाव वगळण्यात आल्याचे सरोज पाटील यांचे म्हणणे आहे. त्या चांगल्याचे संतप्त झाल्या असून पक्ष कार्यकार्त्यांसह राजीनामा देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.


नवी मुंबईत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे शिवसेनेला अच्छे दिन आलेत. मात्र, पक्षातील तीव्र नाराजी शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे. विजय चौगुले यांना जास्त पदे मिळत असल्याने अनेक नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता नाव डावल्यामुळे सरोज पाटील या नाराज झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेत अशीच नाराजी राहिली तर पक्षाला उतरती कळा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.