बलात्काराच्या घटनेनं नगर पुन्हा हादरलं
कोपर्डी प्रकरण ताजे असतानाचा नगर पुन्हा बलात्काराच्या घटनेनं हादरलयं. नगरच्या नांदगाव शिंगवे या गावात एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार घडल्याची घटना घडलीये.
अहमदनगर : कोपर्डी प्रकरण ताजे असतानाचा नगर पुन्हा बलात्काराच्या घटनेनं हादरलयं. नगरच्या नांदगाव शिंगवे या गावात एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचार घडल्याची घटना घडलीये.
घरी भांडी घासायला बोलवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. शनिवारी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपी मल्हारी उमाप फ़रार असून त्याचा सहकारी वाघमारेला अटक करण्यत आलीये. पिडीत मुलीने संबंधित घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर रात्री एक वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.