अहमदनगर : दिल्लीतल्या पालिका निवडणूक निकालानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टिका केली आहे. आपच्या पराभवास केजरीवाल जबाबदार असल्याचा हल्लाबोल अण्णांनी केला आहे, तसंच नेतृत्व म्हणून केजरीवाल अयोग्य असल्याचेही अण्णांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच राज्यातल्या विधानसभा निवडणूकीप्रमाणेच दिल्ली महापालिकेतही भाजपच्या कमळनं आम आदमी पक्षाच्या केजरीवालांना झाडून साफ करून टाकलं आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय.  २७० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८१ जागांवर भाजपचे उमेदवार निवडूण आलेत.


तर दुसऱ्या क्रमांकावर केजरीवालांचा आम आदमी पक्ष आहे. त्यांना 48 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला ३० जागांवर विजय मिळालाय. दरम्यान, हा भाजपचा विजय नसून, ईव्हीएम मशीनमधील फेरफारीचा विजय असल्याचं आपने म्हटलंय.