मुंबई : घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही. कार्यकर्ते तयार आहेत पण नेते त्यांच्या पाठीशी नाहीत म्हणून काँग्रेसला उभारी नाही. या शब्दांमध्ये नारायण राणेंनी पक्षनेतृत्वावर टीका केली होती. नारायण राणेंच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणेंचं मत हे वैयक्तिक आहे. राणे हे निर्णय प्रक्रियेत होते. निकालामागे नेमकी काय कारणं होतील ते समोर येईल असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. तसंच राणेंनी नक्की कुणाबाबत असे झाले ते स्पष्ट करावे. त्यांचा रोख कुणाकडे हे त्यांनी उघड सांगावे, असं आवाहनही अशोक चव्हाणांनी केलं आहे.


बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकमेकांवर जाहीरपणे आरोप करणं योग्य नाही. जाहीर बोलण्यापेक्षा विषय सोडवा अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे.


या निकालावरून अशोक चव्हाण यांनी भाजपलाही लक्ष केलं आहे. भाजपनं सत्तेचा वापर केल्यामुळे त्यांना फायदा झाला. पदासाठी पैशाचा वापर काँग्रेसमध्ये कधीही केला जात नाही असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.