योगेश खरे, नाशिक : नाशिक शहरात पालिका निवडणुकांची रंगत वाढू लागलीय. उमेदवार सकाळ संध्याकाळ प्रचारामध्ये गुंतलेत. मात्र साऱ्यांच्या नजरा महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपचं कडवं आव्हान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे आहेत नाशिकचे मनसेच्या सत्ता काळातील दुसरे महापौर अशोक मुर्तडक... प्रभाग क्रमांक सहामधून तीन भगिनींना घेऊन ते लढत आहेत. शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळख असलेल्या मखमलाबादमध्ये ते फिरताना दिसतायत. रामवाडी, हनुमानवाडी परिसर हा त्यांचा बालेकिल्ला. शहराच्या विकासाबाबत मुर्तडक यांचा दावा आहे. 


भाजपने विद्यमान नगरसेवक दामोदर मानकर आणि भाजप नेते सुनील बागुल यांच्या मातोश्रींना मैदानात उतरवलं आहे. मराठा समाजाचं प्राबल्य असणा-या भागातील मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. गावात कुठल्याही सुविधा न मिळाल्यानं संतप्त मखमलाबाद गावाने एकमताने शिवसेना उमेदवार दीपक पिंगळे यांना रिंगणात उतरवलंय.


मनसेबाबत शहरातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी शेवटच्या काळात केला. खुद्द नगरसेवकांनी साथ सोडल्याने डबे नसलेले इंजिन अशी टीका मनसेवर होतेय.. मात्र नाशिकच्या ट्रेनचे महापौर मुर्तडक हेच इंजिन असल्याने मनसे आणि त्यांचं राजकीय भवितव्य इथं पणाला लागलंय.