मुंबई: राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना धमकी देणारे भाजप नेते मोहित कंबोज यांच्या दिंडोशीमधल्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. कंबोज यांच्या कार्यालयाची काही जणांनी तोडफोड केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंबोज यांच्या कार्यालयावर हा हल्ला मनसे कार्यकर्त्यांनी केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. हा हल्ला नेमका कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत. 


मोहित कंबोज हे मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत. मोहित कंबोज यांनी खुलेआम पत्र लिहून राज ठाकरेंना धमकी दिली आहे. उत्तर भारतीयांचं मुंबईमध्ये तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करु, असं या पत्रात लिहण्यात आलं आहे. 


तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असंही या पत्रात कंबोज यांनी लिहिलं आहे. मनोज कंबोज यांनी धमकीचं हे पत्र फेसबूकवरही टाकलं आहे.