बदलापूर : कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शरद तेली जिवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद तेली काल त्यांच्या प्रभागातल्या एका सोसायटीमध्ये पुजेसाठी गेले होते. तिथून परतत असताना दबा धरून बसलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. 


मात्र तलवारीचा वार चुकल्यानं त्यांच्या मानेवर तलवारीची धार नसलेली बाजू लागली. त्यात ते खाली पडले. हा हल्ला नक्की कोणत्या कारणांमुळे झाला आणि कोणी हा हल्ला केला याचा तपास पोलीस करताहेत. शरद तेली यांना उपचारांसाठी बदलापुरातील धन्वंतरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.