आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरण, मुलीच्या हत्येचा प्रयत्न
आंतरजातीय प्रेम विवाह प्रकरणाच्या वादातून मुलीला विष पाजून संपवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील निभारी गावात घडली.
अमरावती : आंतरजातीय प्रेम विवाह प्रकरणाच्या वादातून मुलीला विष पाजून संपवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील निभारी गावात घडली.
दलित मुलाशी विवाहाचा अट्टाहास करणा-या मुलीला वडील, भाऊ, काका, आणि मामानं कायमचं संपवण्याचा प्रयत्न झाला.
अमरावती जिल्ह्यातील निंभारी या गावातील श्रध्दा सगणे या 19 वर्षीय युवतीच गावातीलच विश्वजीत दांडगे या दलित समाजाच्या युवकाबरोबर प्रेम प्रकरण सुरु होतं. याचा सुगावा मुलीच्या कुटुंबीयांना लागला असता त्यांनी त्याचा विरोध करत मुलीलाच संपवण्याचा प्रयत्न केला.