औरंगाबाद : महापालिका महापौर पदावर भाजपचे भगवान घडामोडे यांची निवड झाली आहे तर उपमहापौर पदी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हात उंचावून झालेल्या मतदानात, भाजपच्या भगवान घडामोडे यांना 70 मत मिळाली तर प्रतिस्पर्धी असलेल्या एमआयएमच्या उमेदवाराला 25 मत मिळाली म्हणजे तब्बल 45 मतांनी घडामोडे यांनी विजय मिळवला, तर उपमहापौरपदी  शिवसेनेच्या स्मिता घोगरे यांनी तब्बल 46 मतांनी विजय मिळवला त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला.  


दोन्ही निवडणून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा काळ हा आता 11 महिन्यांचा असणार आहे दरम्यान शहरातील अनेक समस्या अजूनही प्रलंबित आहेत. अधिकारी आणि पदाधिकारी यांना सोबत घेवूनच समस्या सोडवणार असल्याचं नवे महापौर, उपमहापौरांनी स्पष्ट केले.