बुलेटवर हर्षवर्धन पाटलांच्या मागच्या सीटवर अविनाश घोलप
इंदापूर शहरातील रॉयल इंफिल्ड गाडीच्या नवीन मॉडेलचे लॉंचिंग माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या मागे बसलेली व्यक्ती पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
पुणे : इंदापूर शहरातील रॉयल इंफिल्ड गाडीच्या नवीन मॉडेलचे लॉंचिंग माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या मागे बसलेली व्यक्ती पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
कधी काळी हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर आसणारे पण सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आसलेल्या छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अविनाश घोलप हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी पाटील यानी बुलेट गाडीवर चक्क अविनाश घोलप याना घेउन शहरात चक्कर मारली. सध्या झेडपी- पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी आहे.. त्यात या दोघांनी एकाच गाडीवर शहरातून फेरफटका मारल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आलंय.
सध्या घोलप हे राष्ट्रवादीच्या कळपात आहेत त्यांच्या भागातील झेडपी आणि पंचायत समिती उमेदवारी ही त्यांच्याच घराण्याला दिली जाते हा आज पर्यंतचा इतिहास आहे. या फेरफटक्यामुळे काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.