रायगड : पनवेल येथील खारघर इथल्या पूर्वा डे केअर या पाळणाघरात 10 महिन्यांच्या बालिकेला मारहाणप्रकरणी पाळणाघराची मालकीण प्रियांका निकम हीचा जामीन रद्द करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबागच्या सहाय्यक सत्र न्यायाधीश ए. डी. सावंत यांनी आज हा निर्णय दिला. 21 नोव्हेंबरला 10 महिन्यांच्या चिमूरडीला या पाळणाघरात आयाने अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर पाळणाघराची संचालिका प्रियांका निकम आणि आयावर गुन्हा दाखल झाला होता. 


दरम्यान, प्रियांकाची जामिनावर मुक्तता झाली होती. माध्यमांच्या दबावानंतर अखेर पोलिसांनी प्रियांकाचा जामीन रद्द व्हावा यासाठी अलिबागच्या जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर सुनावणीच्यावेळी जामीन रद्द केला.