ठाणे : ठाण्यातले राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक आणि १ माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहे. विरोधी पक्षनेते संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, स्थानिक नगरसेवक उषा भोईर आणि माजी नगरसेवक रविंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं ठाण्यात राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.


निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांतून नाराजांचे आऊटगोईंग आणि इनकमिंग सुरू झालं आहे.