बदलापूर स्थानकाची स्वच्छता आणि सुशोभीकरण
बदलापूर स्थानकाचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे.
ठाणे : रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर तंबाखूच्या पिचकाऱ्यांची रंगकला, रंग उडालेल्या भिंती हे बघायची सवय... पण आता बदलापूरला उतरलात तर हे चित्र दिसणार नाही. कारण रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरियाच्या पुढाकारानं बदलापूर स्थानकाचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे.
विद्यार्थी आणि बदलापूरच्या नागरिकांनी स्थानकाची स्वच्छता केली आणि त्यानंतर सुरू झालं कलेचं सादरीकरण... रूळ ओलांडू नका, पाणी बचत, वीजेची योग्य वापर, बेटी बचाओ, रक्तदान करा, परिसर स्वच्छ ठेवा असे संदेश या चित्रांच्या माध्यमातून देण्यात आलेत. या मोहिमेत प्रवाशांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. ही स्वच्छता आणि सुशोभिकरण कायम राहावं, म्हणून दर तीन महिन्यांनी ही मोहिम पुन्हा राबवली जाणार आहे. रोटरी क्लबचे वरिष्ठ अधिकारीही याची तपासणी करणार आहेत.
पाहा व्हिडिओ