कोल्हापूर : शहरात आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. यामध्ये एस.सी., एस.टी, एन.टी,  ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 


कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटकातील काही भागातुन मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. अट्रोसिटी कायद्याची कठोरपणे अमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. 


तसंच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या निर्णयात सरकारनं हस्तक्षेप करु नये अशीही मागणी पुढं करण्यात आली. 


धनगर समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे अशा अनेक मागण्या या मोर्चाच्यावेळी करण्यात आल्या.