मुंबई: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचं बजेट विधानसभेमध्ये सादर केलं. या बजेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं योजनची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेत असलेली शिवसेना भाजपच्या विरोधात बहुतेक वेळा बोलते, त्यामुळे या बजेटमध्ये बाळासाहेबांच्या नावानं योजना सुरु करुन शिवसेनेचा विरोध कमी करायचा भाजपचा प्रयत्न असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. 


स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियान असं या योजनेचं नाव आहे. ग्रामपंचायत अधिक सक्षम करण्यासाठी, तसंच या प्रक्रियेत महिलांचा सहभाग करण्याचा या अभियानाचा हेतू आहे. या योजनेसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


अर्थसंकल्पामध्ये खेड्यांसाठी काय ?


स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियान 


सर्व ग्रामपंचायतींमध्ये डिजीटल बोर्ड


स्मार्ट गाव योजना


राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी १७० कोटी


राष्ट्रीय पेयजल योजना हाती घेणार


पंढरपुरात नव्या नमामी चंद्रभागा योजनेची घोषणा... २० कोटींची तरतूद


अंगणवाड्यांसाठी १०० कोटींची तरतूद


अंगणवाडी सेविका, मदतनिसांना सुरक्षा पुरवणार