अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रणसंग्रामात थोरात-विखे वाद
जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून तालुक्याच्या ठिकाणाहून मतदान यंत्रासह मतदान साहित्य घेऊन कर्मचारी नेमणुक असलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील मतदान केंद्रावर या कर्मचार्यांना पोहोच करण्यासाठी एसटी बस, टेम्पो, जीप या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान सर्व निवडणुक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकार्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ७३ आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रशासनाच्यावतीने मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून तालुक्याच्या ठिकाणाहून मतदान यंत्रासह मतदान साहित्य घेऊन कर्मचारी नेमणुक असलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील मतदान केंद्रावर या कर्मचार्यांना पोहोच करण्यासाठी एसटी बस, टेम्पो, जीप या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान सर्व निवडणुक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी आणि अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी बी. एच. पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकार्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
या निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत बाळासाहेब थोरात आणि राधाकष्ण विखे यांच्यातील वाद महत्वाचा ठरला आहे. बाळासाहेब थोरातांनी संगमनेर तालुक्यातील मात्र राधाकष्ण विखेंच्या शिर्डी मतदार संघातील आश्वी आणि जोर्वे गणात गटात काँग्रेसच्य़ा उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवार उभे केल आहेत. विखे -थोरात याच्यात जोरदार वाद झाले. निवडणुक प्रचार सभेत खालच्या पातळीवर जावून टीका केली गेली.