सोलापूर : पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडलाय. या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही बँका सुरु ठेवण्यात आल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामाचा ताण सहन न झाल्याने एका बँक कर्मचाऱ्याला रुग्णालयात हलवण्यात आल्याची घटना सोलापुरात घडलीये. सोलापूरमधील मंगळवेढा स्टेट बँक ऑफ इंडियात शनिवार सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी होती. 


संध्याकाळी सहाच्या सुमारास ५७ वर्षीय घनशाम भास्कर कुलकर्णी यांना कामाच्या अधिक तणावामुळे रक्तदाब आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.