नाशिक : जिल्हाधिकारींनी सर्व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक वर्षाअखेरीस शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान आणि त्यासाठी बॅँकांमध्ये होणाऱ्या गर्दी, हे लक्षात घेऊन, ३१ मार्च रोजी स्टेट बॅँकेसह शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या सर्व बॅँका रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ मार्च या दिवशी शासनाचे व्यवहार स्टेट बॅँकेच्या माध्यमातूनच केले जात असल्यामुळे प्राप्त झालेले अनुदान खर्ची टाकून जिल्हा कोषागार आणि तालुका उपकोषागार कार्यालयाकडून कामकाजाची वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


नाशिकमधील स्टेट बॅँकेची जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार शाखा, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प शाखा, तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या स्टेट बॅँका रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.