बँक घोटाळा : धनंजय मुंडे यांच्यासह १०५ जणांची चौकशी
बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे विरोधी धनंजय मुंडे यांच्यासह १०५ जणांची चौकशी होणार आहे.
बीड : बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे विरोधी धनंजय मुंडे यांच्यासह १०५ जणांची चौकशी होणार आहे.
जिल्हा बँकेत झालेल्या १४२ कोटी रुपयांच्या या घोटाळयाप्रकरणी आजी-माजी संचालक तसेच लाभधारक संस्थांच्या संचालकांसह १०५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे.
या कारवाईमुळे सहकार क्षेत्र आणि राजकारण्यांना मोठा हादरा बसणार आहे. या संचालकांमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील, आमदार अमर सिंग यांच्यासह बीड जिल्ह्यातील ३९ राजकीय नेत्यांचा समावेश आहे.