पुण्यात मेडिकलच्या विद्यार्थिनीचा गळफास
पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आली आहे
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आली आहे. या २६ वर्षीय नाव विद्यार्थिनीचं प्रियंका देवीदास भालेराव आहे.
भारती विद्यापीठातील आयुर्वेदिक महाविद्यालयात एमडीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. प्रियंकाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले. प्रियंकाच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
प्रियंका शिक्षणाच्या निमित्ताने भारती विद्यापीठातील पीजी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती. ती मूळची परभणीची आहे, भारती विद्यापीठ पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.