अलिबाग : रायगडातील भिरा येथे नोंदलेल्या उच्चांकी तापमानात नाविन्य नसून यापूर्वीदेखील यापेक्षा अधिक तापमानाची नोंद भिरा येथे झाली असल्याचा खुलासा कुलाबा वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. हेमंत कारेकर यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढीपाडव्याच्या दिवशी रायगडमधील भीरा इथं जगातील दुस-या क्रमांकाच्या सर्वाधिक 46.5 अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली. या नोंदीबाबत शंकाकुशंका उपस्थित केल्या जात असतानाच कारेकर यांनी भिरा इथल्या तापमानाच्या नोंदीची माहिती घेतली.


भिरा इथं याआधी 27 एप्रिल 2005 रोजी 49 अंश से. इतक्या तापमानाची नोंद झाली  होती. या परीसरातील डोंगर हे कातळाचे आहेत. हे कातळ तापल्याने तापमान वाढते असा अंदाज कारेकर यांनी व्यक्त केलाय. 


तापमापीची दरवर्षी तपासणी करण्यात येते. जर नादुरुस्त असल्यास ती बदलतो असं सांगत त्यांनी तापमापीत बिघाड झाल्याची शक्यता फेटाळली.