भुजबळ परिवाराला आणखी एक धक्का
छगन भुजबळ परीवाराला आणखी एक धक्का बसला आहे.
मुंबई : छगन भुजबळ परीवाराला आणखी एक धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर आणि पुत्र पंकज भुजबळ यांचं महाराष्ट्र एज्युकेशनल ट्रस्ट या संस्थेतलं पद, धर्मादाय न्यायालायनं बेकायदेशीर ठरवलं आहे. त्यानुसार धर्मादाय न्यायालयानं या दोघांचीही पदं रद्द केलं आहे.
गेला महिनाभर या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय न्यायालयात सुरु होती. एमइटीचे माजी पदाधिकारी सुनिल कर्वे यांनी याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर अनेकांच्या साक्षी आणि जबाब नोंदवले गेले. त्याआधारे न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
समीर भुजबळ एमइटीचे खजिनदार होते. तर पंकज भुजबळ एमइटीचे सचिव होते. या दोघांची या पदावरती बेकायदेशीरपणे नियुक्ती झाल्याचं न्यायालायनं निकालात म्हंटलं आहे.