मुंबई: अनधिकृत बॅनर प्रकरणी राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. राहुल गांधी, शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळांना कोर्टानं हे आदेश दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दंड न भरल्यास नोटीस काढण्याचा इशाराही उच्च न्यायालयानं दिलाय. गेल्या आठवड्यातदेखील काही नेत्यांना दंड भरण्याचे आदेश कोर्टानं दिले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत अॅमॅकस क्युरींनी ही नवी नावं न्यायालयासमोर सादर केली. त्यांना कोर्टानं दंड भरण्याचे आदेश दिलेत. 


दरम्यान अनधिकृत बँनरप्रकरणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दंड भरला. 1 लाख 70 हजारांचा दंड शेलारांनी भरला. हा दंड मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आलाय. तर मनसे आणि इतरही पक्षांनी अनधिकृत बँनरप्रकरणी दंड भरला. 


मनसेच्या एका पदाधिका-याने सव्वा लाखांचा दंड भरला. त्यांनी शेतक-यांच्या मदतीसाठी हा निधी सेवाभावी संस्थांना दिलाय. अनधिकृत बँनरप्रकरणी आठवडाभरापूर्वी हायकोर्टानं दंड भरण्यास सांगितलं होतं.