सांगली : सांगली जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप, काँग्रेसची सरशी झाली आहे तर राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर फेकली गेली आहे. पाच नगरपरिषदांपैकी विटा आणि पलूसमध्ये काँग्रेसचा विजय झालाय. तासगाव नगरपरिषदेत भाजपची सत्ता आली आहे. इस्लामपूर नगरपरिषदेमध्ये सर्वपक्षीय विकास आघाडीनं विजय मिळवलाय. तर आष्टा नगरपरिषदेत राष्ट्रवादीप्रणीत आघाडीची सत्ता आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगरपंचायतींपैकी कडेगावमध्ये काँग्रेस, कवठेमहांकाळमध्ये स्वाभिमानी विकास आघाडी तर खानापूरमध्ये त्रिशंकू अवस्था झाली आहे. एकंदरीत सांगली जिल्ह्यात माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे.


तासगाव नगरपरिषदेमधलाही राष्ट्रवादीचा गड ढासळला आहे. या ठिकाणी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं सत्ता काबीज केलीय. भाजपाचे विजय सावंत तासगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत.