लातूर : राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतील वाद मिटविण्यासाठी आपण पडद्यामागून भूमिका वठवित असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं. 


तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला कसलाही धोका नसल्याचा दावा त्यांनी केलाय. राज्य सरकार पाच वर्षच काय तर पुढील 25 वर्ष कसलाच धोका नसल्याचा त्यांनी सांगितलं. तर मुंबईत कुणाचा महापौर बसणार यावर त्यांनी थेट उत्तर देण्यास टाळलं.