यवतमाळ : भाजप आमदार राजू तोडसाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. तोडसाम यांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आमदारांच्या सोशल मीडियाचे प्रमुक रुपेश टाक यांनी केला आहे.


राजू तोडसाम यवतमाळमधील आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. रुपेश टाक यांनी तोडसाम यांच्याशी बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार केली आहे.