मुंबई: जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला देशद्रोही ठरवणं चुकीचं आहे, असं वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेला भाजपनं जोरदार टोला हाणला आहे. कन्हैय्या कुमार शिवसेनेला एवढे आवडले असतील तर त्यांना शाखाप्रमुख करा असा खोचक सल्ला भाजप आमदार गिरीष व्यास यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्हैय्याला चुकीच्या पद्धतीन देशद्रोही ठरवण्यात आलं, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याला आता भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.