ठाणे : राज्यात महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ठाण्यामधील राज्य कार्यकारिणीची बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे. बैठकीआधी युतीला विरोध करणारी पोस्टर लावण्यात आली आहेत. त्यामुळे बैठकीत येणा-या निवडणुकांमध्ये होणा-या युतीबाबत पदाधिका-यांचा काय सूर उमटतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.


सकाळी 11 वाजता कार्यकारिणीच्या सुरवातीला प्रदेशाद्याक्ष रावसाहेब दानवे अध्यक्षीय भाषण करतील. तर कार्यकारणीचा समारोप 4 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे. बैठकीत दिवसभरात 2 प्रस्ताव मांडण्यात येतील. नोटबंदीबाबत अभिनंदन प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणतील , तर राज्यात नगरपरिषदा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन प्रस्ताव विनोद तावडे मांडणार आहेत.