सोलापूर : महानगरपालिकेच्या ३७व्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची तर उपमहापौरपदी भाजपच्या शशिकला बत्तुल यांची निवड झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौर बनशेट्टी यांनी सेनेच्या कुमुद अंकाराम यांचा २८ मतांनी पराभव केलाय तर उपमहापौर भाजपच्या शशिकला बत्तुल यांनी सेनेचे अमोल शिंदे यांचा २८ मतांनी पराभव केलाय. एमआयएमच्या ९ नगरसेवकांनी आणि बीएसपीच्या ४ नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडीतून मतदान न करण्याचा निर्णय घेतला.


त्यामुळे भाजपला विनासायास सत्ता काबीज करता आलीय.  सोलापूरच्या विकासाला प्राधान्य देत विकासावर भर देण्याचे आश्वासन नूतन महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिलाय.