राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्चला सादर होणार
राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार आहे. यंदा सहा मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे.
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार आहे. यंदा सहा मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अधिवेशनात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भातलं विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी कामकाज सल्लागार समितीमध्ये विधी व न्याय विभागाला या विधेयकासंदर्भात निर्देश दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात हे विधेयक आणलं जाण्याची शक्यता आहे, त्यामुळं राज्यात पुन्हा बैलगाडा सुरू होण्याची शक्यता निर्माण झालीय.