पुणे : ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर गुन्हे दाखल होऊनही ते मोकाटच असल्याची वस्तुस्थिती पुण्यात समोर आलीय.  पुण्याच्या पोलीस आयुक्तांनीच या माहितीला दुजोरा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षभरात पुण्यातील २६ बिल्डर्सवर ' महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट नुसार गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये अनेक नामांकितांचा समावेश आहे.  मोफा कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झालेल्या बिल्डर्सना १ ते ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. 


 मुंबई पोलिस कायदा कलम ६४ नुसार दखलपात्र गुन्ह्यात आरोपीला तत्काळ अटक करावी, असे म्हटले आहे. मोफा हा दखलपात्र गुन्हा आहे. असं  असताना गुन्हे दाखल झालेल्यापैकी एकाही  बिल्डरला अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे अशा गुन्हेगार बिल्डर्सना पोलीस अभय देत असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे.  
दरम्यान, संबंधित बिल्डर्सवर तपासाअंती कारवाई केली जाईल, कोणालाही सोडलं जाणार नाही, असा दावा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केला आहे.