पुणे : तामिळनाडूत जल्लिकट्टूसाठी वातावरण तापलेलं असतानाच आता राज्यातही बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात या मागणीसाठी आंदोलन सुरू झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे नाशिक महामार्गावर बैलगाडा मालकांनी आंदोलन केलं. रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात सर्व पक्षीय नेतेही सहभागी झाले होते. 


गेल्या काही दिवसांपासून तामिळनवाडूमध्ये जल्लीकट्टू साठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आता सेलीब्रेटिंनीही सहभाग नोंदवलाय. त्यानंतर आता राज्यातल्या बैलगाडा शर्यतींसाठीही बैलगाडा मालकांना आणि राजकीय नेत्यांनाही जाग आल्याचं दिसतं.