पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकाला तिघांनी जिवंत जाळले
पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाट्यावर एका ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी काल जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्या वृद्धाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुणे : पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाट्यावर एका ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी काल जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्या वृद्धाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
उद्धव उनवने असं त्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. याप्रकरणी पत्नी आणि जावयासह तिघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्धव यांच्या खिशात पोलिसांना एक चिट्ठी सापडली आहे. त्यात पत्नी आणि जावई यांच्याकडून जिवाला धोका असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या चिट्ठीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.