ठाणे : टीएमटीच्या मद्यधुंद बस चालकानं एका पोलीस शिपायाला चिरडलंय. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर बस चालकानं अन्य दोन ट्रकलाही धडक दिलीये. 


यात दोन्ही ट्रकड्रायव्हर जखमी झालेत. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात हा अपघात झालाय. या अपघातानंतर बस चालक गजानन शेजुळ याला अटक करण्यात आली आहे.