जुन्नर : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटाजवळ व-हाडाच्या बसनं पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधल्या 50 प्रवाशांचे प्राण वाचले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायणगावमधून इंदुरला लग्नासाठी ही बस निघाली होती. यावेळी आळेफाट्याजवळ येताच्या अचानक या बसने पेट घेतला. 


यावेळी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तासांनी ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.