नंदूरबार : जिल्हा उद्योग केंद्रात बनावट कागदपत्र तयार करून कोट्यवधींचे शासकीय अनुदान लाटले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदूरबार लाच लुचपत विभागाने केलेल्या खुल्या चौकशीत हा गैरव्यवहार उघडकीस आला असून या प्रकरणी २००१ ते २०१० दरम्यान शासनाची फसवणूक करणारे ३३ अधिकारी कर्मचारी आणि बनावट लाभार्थ्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. 


लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथील लाच लुचपत विभागाच्या पथकांनी आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली.