मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव आणखीनच वाढल्याचं चित्र आहे. उद्या होणारी मंत्रीमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. निवडणूक  आचारसंहितेमुळे जवळपास एक महिना झाली नव्हती, मात्र तरीही बैठक रद्द करण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमधील ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर बैठक रद्द झाल्याची चर्चा रंगली आहे. आता अधिवेशन काळातच पुढची बैठक होण्याची शक्यता आहे.


तर दुसरीकडं विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीलाही शिवसेनेच्या सदस्यांनी दांडी मारलीय. गटनेते एकनाथ शिंदे आणि पक्षप्रतोद सुनील प्रभू हे दोघेही बैठकीला गैरहजर होते. विधान परिषदचे गटनेते दिवाकर रावते आणि पक्षप्रतोद नीलम गो-हेंनीही या बैठकीकडे पाठ फिरवली. या बैठकीला केवळ संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय शिवतरे हे उपस्थित होते. महापालिका निवडणुकीनंतर राज्य सरकारची ही पहिलीच बैठक होती.