बाणेर रोड अपघात प्रकरण, सुजाता श्रॉफवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
पुण्यातील बाणेर रोड अपघात प्रकरणी आरोपी सुजाता श्रॉफवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुणे : पुण्यातील बाणेर रोड अपघात प्रकरणी आरोपी सुजाता श्रॉफवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापूर्वी केवळ बेदरकारपणे गाडी चालवणे आणि अपघातानंतर निघून जाणे असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आपोपीला न्यायालयाकडून तात्काळ जामिन मंजूर झाला होता.
मायलेकींचा जीव घेणाऱ्या आरोपी सुजाता श्रॉफची घटनेनंतर २४ तासांच्या आत सुटका झाल्यानंतर सर्वच स्तरातून पोलिसांवर टीका करण्यात आली होती. तसेच पोलिसांच्या भूमिकेवर संशयही व्यक्त करण्यात आला होता.
अखेर पोलिसांनी आरोपी सुजाता श्रॉफच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचे कलम समाविष्ट केले. त्यामुळे आता पोलीस सुजाता श्रॉफला पुन्हा अटक करण्याची परवानगी न्यायालकडे मागणार आहेत.