पुण्यातल्या प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे
पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटवर सीबीआयनं छापे टाकलेत. कर्ज अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. संस्थेचे संचालक मारुती नवले यांच्या घरावरही छापा टाकण्यात आलाय. सकाळपासून ही कारवाई सुरू आहे.
पुणे : पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटवर सीबीआयनं छापे टाकलेत. कर्ज अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. संस्थेचे संचालक मारुती नवले यांच्या घरावरही छापा टाकण्यात आलाय. सकाळपासून ही कारवाई सुरू आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारूती नवले यांनी सेंट्रल बँकेकडून घेतलेले 75 कोटी बेकायदेशीरित्या दुसरीकडे वर्ग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल केला असून नवले यांच्या घराचीही झडती घेण्यात येणार आहे.
तसंच नवले यांच्या बँक खात्यांची आणि लॉकर्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं समजतं आहे.