मुंबई : नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला लवकरच अटक करणार असल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात सांगितलं आहे. दाभोलकर आणि पानसरेंच्या कुटुंबियांनी कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी झाली. दहा दिवसांमध्ये तपासात प्रगती दाखवून आरोपीला अटक करा, असंही कोर्टानं सीबीआयला सांगितलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सुनावणीवेळी कोर्टानं सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. यंत्रणांना सरकारनं पुरेसं सहकार्य मिळालं नाही तर त्याची गंभीर दखल आम्हाला घ्यावी लागेल, असं कोर्टानं खडसावलं आहे.