काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे हत्या, सीसीटीव्ही फुटेज हाती
भिवंडी महानगर पालिकेच्या काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली. याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे.
ठाणे : भिवंडी महानगर पालिकेच्या काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली. याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. भिवंडी मनपा सभागृह नेते आणि ज्येष्ठ काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या हाताला गोळी लागली. इतकचं नाही तर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्यानंही वार करून रक्तबंबाळ केले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.