अहमदनगर : केंद्र सरकारच्या विविध विकास योजनेतून जिल्ह्यातल्या गावांमध्ये पाहणीसाठी खासदारांचं एक पथक आले. मात्र, केवळ पर्यटन करुन हे पथक दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. ज्या उद्देशाने हे पथक आले, त्या उद्देशाला या पथकाने हरताळ फासल्याचे पुढे आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने या पथकाची नियुक्ती केली होती. हे समिती पथक आले खरे पण समिती पथकाने दोन पैकी फक्त एकाच गावाची पाहणी केली आणि त्यानंतर सहकुटुंब साईदर्शन घेतले. 13 खासदारांची ही समिती आहे. 


संवत्सर आणि डाऊच बुद्रुक या गावांचा पाहणी दौरा खासदारांची ही समिती करणार होती. पण फक्त संवत्सर गावाची पाहणी करुन समितीने थेट शिर्डी गाठले. महत्त्वाचं म्हणजे खासदारांनी शिर्डीतलं पर्यटन केलं ते शसाकीय खर्चातून. 


ही समिती औरंगाबादमधल्या गावांचीही पाहाणी करणार आहे. पण इथली पाहाणीची गावही देवस्थानांच्या किंवा पर्य़टनस्थळांच्या जवळचीच निवडण्यात आली आहेत. सरकारी पैशांमधून कुटुंबियांसह पर्यटन ही कितपत योग्य आहे याचीच आता परिसरात चर्चा सुरू झाली.