भुजबळांना जेलमध्ये हायफाय सुविधा आरोपांवर तटकरे म्हणाले...
कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना हायफाय सुविधा पुरवल्या गेल्याच्या आरोपानंतर पक्षानं भुजबळांची पाठराखण केली आहे.
रत्नागिरी : कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना हायफाय सुविधा पुरवल्या गेल्याच्या आरोपानंतर पक्षानं भुजबळांची पाठराखण केली आहे.
हा न्यायालयीन प्रश्न असल्याचं सांगत भुजबळांच्या पाठिशी राष्ट्रवादी नेहमी उभी असल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.
कारागृहात भुजबळांना सुविधा पुरवल्या प्रकरणी सरकारनं चौकशीचे आदेश दिल्याबाबत विचारल्यावर मला या बद्दल काही माहिती नसल्याचं तटकरे यांनी सांगितलं आहे.