विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, नांदेडमध्ये विरोधक एकवटले
विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.
नांदेड : विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. विधान परिषदेच्या नांदेडच्या जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.
काँग्रेसचे अमर राजुरकर यांच्याविरोधात अपक्ष श्याम सुंदर शिंदे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. शिंदे यांना शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे.
नांदेड हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. नांदेडच्या या जागेसाठी सगळेच विरोधी पक्ष एकवटल्याचं चित्र आहे.
19 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी हे मतदान होणार आहे. यामध्ये पुणे, जळगाव, सांगली-सातारा, यवतमाळ, नांदेड आणि गोंदिया-भंडारा या जागांचा समावेश आहे.