धुळे : तब्बल सहा महिन्यांचा वनवास पूर्ण करून भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतत आहे. सप्टेंबर महिन्यात चंदू चुकून पाकच्या सीमारेषेच्या चालला गेल्याने त्याला पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतले होते. संरक्षण विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून यशस्वी बोलणी करून चंदूला २१ जानेवारी रोजी पाकने भारताला सुपूर्द केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२४ दिवस पाकच्या ताब्यात  चंदू भारतात परत आल्यानंतर त्यावर सैन्य रुग्णालयात उपचार सुरु होते. आता तो आपल्या गावी म्हणजे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथे परतणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्य्त तयारी गावात सुरु आहे.