पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातील सातवी आणि नववीची पुस्तके बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने घेतलाय. यासंबंधीचं परिपत्रक नुकतंच जारी करण्यात आलं. त्यानुसार जून 2017 पासून ही पुस्तकं बदलण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाठ्यपुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक संस्था यांना आवश्यकतेनुसार पुस्तकांची खरेदी करण्याचे आवाहन मंडळानं केलंय. बदलत्या परीक्षा पद्धतीशी सांगड घालण्याकरता पुस्तकांमध्ये बदल करण्यात येतोय.


गेल्यावर्षी पाचवी आणि सहावीची पुस्तके बदलण्यात आली होती. यंदा सातवी आणि नववीची पुस्तके बदलली असून, पुढच्या वर्षी जून 2018 मध्ये आठवी आणि दहावीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत.