छावा संघटना प्रदेशाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, आरोपी फरार
छावा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखील गोळे याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका विवाहित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन, तिच्यावर अत्याचार केल्याचा गोळेवर आरोप आहे.
बदलापूर : छावा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखील गोळे याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका विवाहित महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन, तिच्यावर अत्याचार केल्याचा गोळेवर आरोप आहे.
बदलापूरमध्ये राहणाऱ्या या पीडित महिलेच्या पतीशी निखील गोळे याने ओळख करून घेतली होती. आधी गोळे याने पीडित महिलेशी आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून, तिच्या पतीला तिच्यापासून दूर केले. त्यानंतर गोळे यानं पीडित महिला आणि तिच्या ४ वर्षांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत पीडित महिलेशी २ वर्ष संबंध ठेवले.
या महिलेने गोळेकडे लग्नाची मागणी केली असता त्याने तिला नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे समजताच या महिलेने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी गोळे विरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. निखिल गोळे सध्या फरार आहे.