परभणी : स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकल्याचा प्रकार परभणीमध्ये उघड झालाय. सुमारे पाच कोटींचा गहू आणि तांदुळ काळ्याबाजारात विकल्याचं उघड झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईहून परभणीत गेलेल्या उपसंचालक दर्जाच्या पथकानं केलेल्या तपासणीत हे उघड झालंय. मुंबईच्या एका पथकानं इथल्या सर्व शासकीय गोदामांची तपासणी केली. 


यातच 19 हजार 141 क्विंटल गहू आणि तांदुळ कमी दिसला. हा संपूर्ण माल काळ्या बाजारात विकण्यात आलाय. जिल्हा पुरवठा अधिका-यांनी याबाबत दिलीप कच्छवे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले. यात काही मोठे मासे हाती लागण्याचीही शक्यता आहे.